Ad will apear here
Next
‘विसर्जन घाटावरील कामे पूर्ण करुन आवश्यक सेवा-सुविधा द्याव्यात’
ठाणे : महापालिका कार्यक्षेतील विसर्जन घाटांचे काम पूर्ण करुन आवश्यक सेवा-सुविधा देण्यात याव्यात  तसेच दरवर्षी निर्माण करण्यात येणारी कृत्रिम तलाव न करता मासुंदा तलावाच्याक धर्तीवर कायम स्वरुपी कृत्रिम तलाव तयार करण्यात यावे, असे आदेश महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांनी पाहणी दौऱ्या दरम्यान प्रशासनास दिले.

महापालिकेच्या वतीने दरवर्षी विविध ठिकाणी श्री गणेश मुर्ती विसर्जन घाट तयार करण्यात येतात. या विसर्जन घाटांवरील पूर्व तयारीची बैठक महापौर यांनी त्या-त्या विभागातील नगरसेवक व संबंधित अधिकारी यांचे समवेत केली. सदर पाहणी दौऱ्यास नगरसेवक पल्लवी कदम, मिलिंद पाटणकर, कृष्णा पाटील, नंदा पाटील, दिपा गावंड, मालती पाटील, नम्रता पमनानी, शर्मिला गायकवाड, विकास रेपाळे, परिषा सरनाईक, नरेंद्र सुरकर, पद्मा भगत, साधना जोशी, सिध्दार्थ ओवळेकर, माजी नगरसेवक गिरीश राजे व नम्रता भोसले तर प्रशासनाचे वतीने सहाय्यक आयुक्त मारुती गायकवाड, अनुराधा बाबर, प्रदिप मकेश्वर, झुंजार परदेशी, उपनगर अभियंता राजन खांडपेकर, कार्यकारी अभियंता हनमंत एमेलवाड, प्रशांत फाटक, चेतन पटेल, रामकृष्ण कोल्हे, भारत भिवापूरकर, नितीन पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.बालाजी हळदेकर, प्रदुषण नियंत्रण अधिकारी मनिषा प्रधान, उप अभियंता महेश बहिरम, संजय कदम, प्रशांत शेडगे, ऋषिकेश जवळकर, नादावडेकर, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक शाम कसबे आदी उपस्थित होते.

या पाहणी दौऱ्या दरम्यान मासुंदा तलाव, आंबे-घोसाळे तलाव, कोपरी, रायलादेवी तलाव, उपवन तलाव, गायमुख, कोलशेत येथील विसर्जन घाटाची पाहणी करुन सर्व कामे पूर्ण करण्याची यामध्ये कृत्रिम तलाव तयार करणे, विद्युत व्यवस्था, पिण्याचे पाणी, साफसफाई, आवश्यकतेनुसार निर्माल्य कलश पुरविणे, बॅरीकेटींग करणे व सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाय योजना करणे, आवश्यकतेनुसार पायऱ्या बांधणेसाठी तसेच माहिती फलक लावणेबाबत सर्व संबंधितांना महापौर यांनी सूचना केल्या.  तसेच दरवर्षी आपण कृत्रिम तलावांची निर्मिती करतो तसे न करता अस्तित्वातील तलावांमध्ये मासुंदा तलावाच्या धर्तीवर तलावांमध्येस एका बाजूस कायम स्वरुपी कृत्रिम तलाव करुन, यावर सुरक्षिततेच्या दृष्टीने लोखंडी जाळी बसवून निर्माल्य वा अन्य प्रकारे गैरवापर होणार नाही यादृष्टीने कार्यवाही करण्याचेही आदेश या वेळी दिले.

महापालिकेच्या माध्यमातून कृत्रिम तलाव तयार करण्यात आले असून, गेल्या १० ते १२ वर्षांपासून हा अभिनव प्रकल्प महापालिका राबवित आहे व याचे अनुकरण आज अनेक महापालिका क्षेत्रात करण्यात येत आहे. महापालिकेच्या उपक्रमास निश्चितच ठाणेकरांचा प्रतिसाद मिळाला, त्यामुळे तलाव अबाधित राखण्यास मदत होते. यावर्षी देखील कृत्रिम तलाव, स्वीकार केंद्र तयार करण्यात आली असून, नागरिकांनी याचा वापर करावा.

तसेच महापालिका, पोलीस विभाग व वाहतुक नियंत्रण विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करुन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापौर यांनी या वेळी नागरिकांना केले. तर समस्तक ठाणेकरांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा या निमित्ताने महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांनी दिल्या.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OYZCBF
Similar Posts
पोलिस स्टेशनचे ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने कावेसर व पारसिक या दोन्ही सुविधा भूखंडांवर नव्याने बांधण्यात आलेल्या कासारवडवली आणि कळवा पोलिस स्टेशनचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व सार्वजनिक बांधकाम एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महापौर मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे
शैरील चार्ल्सचे अभिनंदन ठाणे : ‘वर्ल्ड नेक्स्ट टॉप मॉडल २०१७’ व ‘मिस टिआरा इंडिया २०१७’ विजेती शैरील चार्ल्स यांचे महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांनी पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले व भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी सभागृह नेते नरेश म्हस्के, नगरसेवक योगेश जानकर, माजी नगरसेवक हिरा पाटील, उपायुक्त अशोक बुरपल्ले आदी मान्यवर उपस्थित होते
वृक्षांच्या सभोवतीचे काँक्रीट व डांबर काढण्याचे आदेश ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत विविध ठिकाणी रस्त्याची कामे करताना रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांच्यात खोडाच्या सभोवताली काँक्रीटीकरण अथवा डांबरीकरण केल्यामुळे वृक्षाच्या खोडाला व मुळांना हवा (ऑक्सीजन) व पाणी याचा पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होत असल्याने महापालिकेच्यावतीने शहरातील वृक्षांच्या खोडाच्या
‘डॉ. आनंदीबाई जोशी रुग्णालय इमारतीचा पुनर्विकास तातडीने करावा’ ठाणे :  महापालिकेच्या वर्तकनगर येथील डॉ. आनंदीबाई जोशी रुग्णालयाच्या इमारतीचा तातडीने पुनर्विकास करण्याचे आदेश महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांनी रुग्णालयाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान प्रशासनास दिले.   वर्तकनगर येथील महापालिकेच्या डॉ. आनंदीबाई जोशी रुग्णालयात शॉटसर्किट झाले. सुदैर्वाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही हानी झाली नाही

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language